
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कधीकाळी सात ते आठ चंदनाची झाडे होते. या परिसराचे वैशिष्ट्य होते. मात्र मेडिकलमधून ही चंदनाची झाडे कधी कापली, कधी चोरीला गेली कुणालाच कळले नाही. सध्या चंदनाचे झाड येथील आवारात शोधूनही सापडत नसल्याची तक्रार काही कर्मचाऱ्यांनी केली.