हे सरकारच घटनाबाह्य व बेकायदेशीर - संजय राऊत

Sanjay Raut Latest Marathi News
Sanjay Raut Latest Marathi NewsSanjay Raut Latest Marathi News

नागपूर : राज्यात नव्याने स्थापन झालेले शिंदे सेना आणि भाजपचे सरकार अद्याप अस्तित्वात आले नाही. १६ आमदारांवर अपात्रतेची तलवार असताना निर्णय घेणे आणि मंत्रिमंडळाची स्थापना करणे घटनाबाह्य आणि घटनाद्रोही असल्याची टीका शिवसेनेचे खासदार व राष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत यांनी केली. रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल शिंदे गटात गेल्याने येथील पडझड रोखण्यासाठी संजय राऊत नागपुरात आल्याचे बोलले जात आहे. (Sanjay Raut Latest Marathi News)

आज जे काही सुरू आहे तो भास आहे. तात्पुरता आहे. शिवसेना अशा अनेक संकटातून बाहेर आलेली आहे. शिवसेना विदर्भात मोठ्या प्रमाणात काम करीत आहे. शहर आणि ग्रामीण भागात चांगले काम सुरू आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

Sanjay Raut Latest Marathi News
अशोकस्तंभाचा वाद : मूळ चिन्ह बनवणारे डिझायनर प्राणिसंग्रहालयात का गेले?

एकनाथ शिंदे गटाच्या बंडाने महाआघाडीचे सरकार कोसळल्यानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) प्रथमच नागपुरात आले. दोन दिवसांसाठी नागपूर दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी विमानतळावर संवाद साधला. आधी मी मुख्यमंत्र्यांच्या शहरात येत होतो. आज मी उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात आलो, असे आठवणही संजय राऊत यांनी करून दिली.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपण वारंवार नागपूरला येणार असल्याचे मागे जाहीर केले होते. मात्र, त्यावेळी शिवसेना (Shiv sena) एकजूट होती. भाजपला पराभूत करण्यासाठी आघाडीने पुढील निवडणुका एकत्रितपणे लढाव्या यावर सर्व नेत्यांचे एकमत होते. आता शिवसेना फुटली आहे. आता त्यांना आपले सहकारी फुटू नये याची अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

सरकार बेकायदेशीर

मुळात शिंदे-भाजपचे सरकार बेकायदेशीर आहे. १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना मुख्यमंत्र्यांनी शपथ घेणे योग्य नाही. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होत आहे. अशावेळी राजभवनातून शपथ देणे बेकायदेशीर आहे. महाराष्ट्रात घडलेल्या प्रकारानंतर नागपूर आणि नागपूर ग्रामीण भागातील शिवसैनिकांचे मत जाणून घेण्यासाठी आलो आहे, असेही खासदार संजय राऊत म्हणाले.

नागपूरमध्ये पक्षाच्या कामासाठी आलो

आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनीच मंत्रिमंडळाची बैठक घेतली. हेसुद्धा घटनाबाह्य आहे. यावेळी त्यांनी जनतेच्या हितासाठी इंधनावरच्या करात कपात केली आम्ही याचे स्वागत करतो. नागपूरमध्ये पक्षाच्या कामासाठी आलो. सर्व जागच्या जागी आहे. माझे स्वागत करायला सगळे आले. असेच चित्र महाराष्ट्रात आहे. शिवसेना अशा अनेक प्रसंगातून बाहेर पडली आहे. ५६ वर्षांत अनेक संकटे, वादळे आम्ही पाहिली. त्याने काही फरक पडलेला नाही. शिवसेना पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मला पाठवले आहे. रामटेक विधानसभा मतदार संघातून अनेक जण आले आहेत याकडेही राऊत यांनी लक्ष वेधले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com