सरोज खान यांनी नागपूरकरांच्या टॅलेंटला दिली होती भरभरून दाद, व्यक्‍त केली होती ही मनीची इच्छा

Saroj Khan appreciate the talent of Nagpurkar
Saroj Khan appreciate the talent of Nagpurkar

नागपूर : डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या विदर्भस्तरीय नृत्यस्पर्धेच्या परीक्षणासाठी प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सरोज खान आल्या होत्या. 2013 साली झालेल्या या स्पर्धेवेळी त्यांनी नागपूरकरांच्या टॅलेंटचे कौतुकही केले होते. नृत्यदिग्दर्शक यशवंत मांडळकर यांनी सरोज खान यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे शुक्रवारी पहाटे निधन (वय 71) झाले. सरोज खान यांचे जाणे नागपूरकर रसिकप्रेक्षकांना धक्‍का देणारे ठरले असून, 2013 साली आयोजित नृत्यस्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला सरोज खान यांच्यासोबत घालवलेले क्षण आठवले. विशेष म्हणजे या दौऱ्यात त्यांनी ताजबागला जाण्याची इच्छा व्यक्‍त केली होती. 

आयोजनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या नृत्यदिग्दर्शक यशवंत मांडळकर यांना सरोज खान यांना जवळून बघता आले. आठवणीचा उजाळा देताना त्यांनी तो दिवस आजही आठवत असल्याचे सांगितले. मोठ्या ताजबागचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्‍त केल्यानंतर सरोज खानची तेथे जाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच परीक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन आजही स्पष्टपणे आठवत असल्याचे मांडळकर म्हणाले. 

सरोज खान यांनी दोन हजारांपेक्षा जास्त गाण्यांची कोरिओग्राफी केली होती. इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी त्या बॅकग्राउंड डान्सर होत्या. 1950 च्या दशकातील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर बी. सोहनलाल यांच्याकडून त्यांनी डान्सचे प्रशिक्षण घेतले होते. त्यांच्याशीच त्यांनी विवाह केला. त्यांनी 1974 मध्ये पहिल्यांदा सिनेमाच्या गाण्याची कोरिओग्राफी केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. सरोज खान यांनी 1986 मधील नगिना, 1987 मि. इंडिया, 1988 मधील तेजाब, 1989 मधील चांदनी यासारख्या हिट चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांतील गाण्यांच्या कोरिओग्राफीसाठी त्यांना पुरस्कृतही करण्यात आले. 

"मला मुंबईला घेऊन चला' 

विदर्भस्तरीय नृत्यस्पर्धेचे संचालन करणाऱ्या अंश रंधे या बाल कलावंताने स्टॅण्डअप कॉमेडीच्या माध्यमातून सरोज खान यांना चांगलेच हसविले होते. तू मल्टीटॅलेंटेड आहेस, खूप मोठा होशील, असा आशीर्वाददेखील सरोज खान यांनी दिला होता. त्यानंतर अंशने मला मुंबईला घेऊन चला अशी विनंती केली होती. सरोज खान यांनी मुंबईत आल्यावर घरी येण्याचे निमंत्रण अंश यास दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com