फक्त १७ ग्रामपंचायतींमध्ये झाल्या निवडणुका, सरपंच आरक्षण सोडत मात्र ७० ग्रामपंचायतींची

sarpanch reservation announce for seventy grampanchayat in jalalkheda of nagpur
sarpanch reservation announce for seventy grampanchayat in jalalkheda of nagpur

जलालखेडा : एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या नरखेड तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. तालुक्यातील ७० ही ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत निवडणुकीपूर्वी काढण्यात आली होती. पण शासनाच्या एका आदेशाने ती रद्द करत पुन्हा निवडणूक झाल्यानंतर सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. पण यावेळी निवडणूक झालेल्या १७ च नव्हे तर तालुक्यातील ७० ही ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. यामुळे आता पुढे होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंचपदाचे आरक्षण हेच राहणार की पुन्हा निवडणुकीनंतर सरपंच आरक्षणाची सोडत निघणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

नरखेड तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीमध्ये १५ जानेवारीला निवडणूक पार पडली. निवडणुकीपूर्वी तालुक्यातील ७० ही ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची १० डिसेंबर २०२० ला सोडत काढण्यात आली होती. पण ती रद्द झाल्याने निवडणूक नंतर १ फेब्रुवारीला पुन्हा नव्याने ७० ही ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. ही सोडत नरखेड येथील तहसीलदार डी. जी. जाधव यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आली होती. 

अनुसूचित जातीसाठी सरपंच पदासाठी आरक्षित ग्रामपंचायती - जलालखेडा, उमठा, दिंदरगाव, भिष्णूर, मायवाडी, घोगरा.

अनुसूचित जाती स्त्रियांकरिता सरपंचपदासाठी आरक्षित ग्रामपंचायती - भिष्णूर, तिनखेडा, रामठी, भारसिंगी, मोहगाव भदाडे, खापा ( घुडन) अनुसूचित जमातीसाठी सरपंचपदासाठी आरक्षित ग्रामपंचायती- खैरगाव, पेठइस्माईलपूर, मदना, वाढोणा. 

अनुसूचित जमाती स्त्रियांसाठी सरपंच पदासाठी आरक्षित ग्रामपंचायती - थुगाव निपाणी, देवग्राम, खेडी कर्यात, सावरगाव.

नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या सरपंच पदाकरिता आरक्षित ग्रामपंचायती- सिंगारखेडा, लोहारी सावंगा, पिंपळा केवळराम, हिवरमठ, येरला इंदोरा, महेंद्री, शेमडा, मसोरा, पिंपळगाव वखाजी, रोहणा. 

नागरिकांचा मागास महिला प्रवर्गाकरिता सरपंचपदाकरिता आरक्षित ग्रामपंचायती - जामगाव खुर्द, खरबडी, थडीपवनी, सिंदी, उमरी, वडविहिरा, बानोरपिठोरी, थाटूरवाडा, साखरखेडा, सर्वसाधारण करिता सरपंचपदाकरिता आरक्षित ग्रामपंचायती-माणिकवाडा, दातेवाडी, सायवाडा ( अंबाडा ), सिंजर, खराळा, मेंढला, आग्रा, येनिकोणी, मोहदी दळवी, खरसोली, मोहदी धोत्रा, परसोडी दीक्षित, खराशी, खापरी केने, विवरा, वडेगाव उमरी

सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरिता सरपंचपदासाठी आरक्षित ग्रामपंचायती - देवळी, अंबाडा सायवाडा, अंबाडा देशमुख, बेलोना, खंडाळा बु., पिंपळगाव राऊत, जामगाव बु., आरंभी, मालापूर, खेडी गो. गो., जुनोना फुके, गोधनी गायमुख, मोगरा, नारसिंगी, बानोरचंद्र, दावसा 

निवडणूक झालेल्या १७ ग्रामपंचायती - 
नरखेड तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीमध्ये १५ जानेवारीला निवडणूक पार पडली. यात तालुक्यातील अंबाडा ( साय. ), दातेवाडी, देवळी, जलालखेडा, जामगाव ( खु. ), खैरगाव, खरबडी, मदना, महेंद्री, माणिकवाडा, पेठइस्माईलपूर, सायवाडा ( अं. ), सिंजर, थडीपवनी, देवग्राम, उमठा, येरला ( इंदोरा ) या १७ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यातील काहीच गावांमध्ये सरपंच पदासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com