esakal | सात महिलांनी नाकारले चक्क सरपंच पद, 'बाळू'साठी धरला हट्ट

बोलून बातमी शोधा

seven women not accept sarpanch offer in rajura of chandrapur }

सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या चुनाळा येथील ग्रामपंचायतीची सदस्य संख्या तेरा आहे. यात सात महिला राखीव जागेवर निवडून आल्या आहेत.

सात महिलांनी नाकारले चक्क सरपंच पद, 'बाळू'साठी धरला हट्ट
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजुरा (जि. चंद्रपूर) : राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो. सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारा व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजयी होताना बरेचदा पाहिले आहे. परंतु, सरपंच पदाची माळ गळ्यात पडत असताना निवडून आलेल्या सात महिला उमेदवारांनी नाकारत आम्हाला सरपंच पदी बाळूच हवा, असा हट्ट धरला. याच मागणीसाठी चुनाळावासीयांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. तहसीलदार हरीश गाडे यांना निवेदन देत सरपंच पदाचे आरक्षण बद्दलविण्याची मागणी केली. 

हेही वाचा - Big Breaking : वर्ध्यातील उत्तम गाल्व्हा कंपनीत भीषण स्फोट, २५ जण गंभीर जखमी

तालुक्‍यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या चुनाळा येथील ग्रामपंचायतीची सदस्य संख्या तेरा आहे. यात सात महिला राखीव जागेवर निवडून आल्या आहेत. नुकतेच सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत निघाली. यात चुनाळा ग्रामपंचायतीसाठी सर्वसाधारण महिला राखीव प्रवर्गातून आरक्षण आले. त्यामुळे सरपंच पदाची माळ कोणत्याही एका महिलेचा गळ्यात पडणार हे निश्‍चित होते. असे असताना येथील निवडून आलेल्या संतोषी निमकर, जया निखाडे, उषा करमनकर, संतोषी साळवे, अर्चना आत्राम, कोमल काटम, वंदना पिदूरकर या नवनियुक्त महिलांसोबत पाच पुरुष उमेदवारांनी आम्हाला सरपंच पदी बाळनाथ वडस्कर यांचीच निवड करायची असल्याने  प्रशासनाने सरपंच पदाच्या आरक्षणात बदल करण्याची मागणी केली. यापूर्वीही सरपंच पदासाठी महिला राखीव प्रवर्गातून आरक्षण निघाले होते. आताही महिला राखीव निघाल्याने हे आरक्षण चुकीचे आहे. त्यात बदल करण्याची मागणी करण्यासाठी सर्व नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य आणि चुनाळावासींनी तहसील कार्यालय गाठले. तहसीलदार हरीश गाठे यांच्याकडे मागणी केली.

हेही वाचा - काळजात धस्स करणारी हिंगणघाटची घटना; काय घडले होते...

सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे माजी उपसरपंच व नवनियुक्त सदस्य बाळनाथ वडस्कर यांनी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली.  तेरापैकी तेरा उमेदवार निवडून आणले . जनतेने बाळू गळ्यातील ताईत समजून भरघोस मतांनी निवडून दिले. मात्र, निवडणुकीनंतर आरक्षणाच्या बदलाने बाळूचे कार्य हिराविले. नागरिकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे.

मागील पाच वर्षांपासून गावात शांतता व सुव्यवस्था टिकवून ठेवण्याचे काम माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य बाळनाथ वडस्कर यांनी केले. गावातील सर्वसामान्यांच्या मदतीला दिवस रात्र धावून जाणारा समाजसेवक म्हणून गावातील प्रत्येक व्यक्ती बाळू यांचे नाव घेत आहे. असाच माणूस गावाचा कारभारी म्हणून आम्हाला हवा आहे. आम्ही निवडून आलेल्या सात महिला सरपंच पद स्वीकारणार नाही. 
-जया निखाडे, नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य चुनाळा.