Satyanarayan Nuwal’s Inspirational Journey
esakal
सत्यनारायण नुवाल यांना यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. शिक्षण पूर्ण झाले नाही, लहान वयातच लग्न झाले आणि काही करायला वेळ मिळाला नाही. एक वेळ तर अशी आली की त्यांनी रेल्वे स्टेशनवर रात्र काढली. पण जो हार मानत नाही, त्याला यश मिळते, असे म्हणतात. फक्त दहावीपर्यंत शिक्षण, वयाच्या १९ व्या वर्षी लग्न आणि नवीन जबाबदाऱ्या, पण हिंमत अन् दृढनिश्चय एवढा की सत्यनारायण नुवाल हे नाव आज फक्त देशात नाही तर विदेशातही मोठे झाले आहे.