Nagpur Accident: खापा मार्गावर आयशरने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Accident News: सावनेर येथे झालेल्या भीषण अपघातात प्रा. डॉ. प्रकाश काकडे यांचा जागीच मृत्यू झाला. विद्यार्थिनी तनू मरस्कोल्हे गंभीर जखमी झाली असून उपचार सुरू आहेत.
Nagpur Accident

Nagpur Accident

sakal

Updated on

सावनेर : येथील प्रा. डॉ. प्रकाश रामचंद्र काकडे यांचे अपघाती निधन झाले. दुपारी ४ च्या सुमारास महाविद्यालयाला सुटी झाल्यानंतर शेतावर जाण्याकरिता, एम एच ४० डीडी ६६४४ क्रमांकाच्या बुलेटने खापा चौकातून विद्यार्थिनी तनू संजय मरस्कोल्हे (वय १९) हिला रा. आजनीला सोडण्यासाठी निघाले असता खापा मार्गावर रेल्वे क्रॉसिंग सावनेर समोरील वळणावर आयशरने जोरदार धडक दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com