सावनेर : भरधाव वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी आहे..ही घटना सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावंगी शिवारात शनिवारी (ता.७) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. धीरज शालिकराम चाफेकर (वय अंदाजे ३८) राहणार सावंगी असे मृताचे नाव आहे. तर देवकाबाई शालिकराम चाफेकर (वय अंदाजे ६०) राहणार सावंगी असे जखमी महिलेचे नाव आहे..घटनेच्या वेळी ते एमएच ४०बीटी क्रमांकाच्या मोटरसायकलने सावंगीहून सावनेरकडे जात होते दरम्यान अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली.या अपघातात धीरजचा मृत्यू झाला व त्याची आई देवकाबाई गंभीर जखमी झाल्या..Gadchiroli Accident: गडचिरोली येथील अहेरी तालुक्यात अंत्यविधीहून परतताना चारचाकी पुलाखाली; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ रुग्णवाहिकेने रुग्णालयात हलविले असता येथील डॉक्टरांनी धीरजला मृत घोषित केले तर जखमी महिलेला नागपूरला उपचारासाठी पाठविण्यात आले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.