

Nagpur Kidnapping Case
sakal
सावनेर : शाळेत जातो असे सांगून घरातून निघालेला ८ व्या वर्गातील एक विद्यार्थी बेपत्ता झाल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी सावनेर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून मुलाची शोध मोहीम सुरू केली आहे. मुलाचा शोध न लागल्याने आई-वडिलांनी आक्रोश केला आहे.