esakal | जिल्हा परिषदेत घोटाळे, गैरव्यवहार थांबता थांबेना; आता हा घोटाळा आला उघडकीस
sakal

बोलून बातमी शोधा

Scam in buying bags in jilha parishad

खरेदी लाखोंच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. खरेदी असल्याने विषय वित्त,स्थायी किंवा सभेत येणे आवश्यक होता. परंतु पदाधिकाऱ्यांना डावलून ही खरेदी करण्यात आली. विशेष म्हणजे पंचायत समिती सभापती यांनाही बॅग देण्याची प्रथा आहे. परंतु त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे यात घोटाळा झाल्यीची चर्चा होत आहे.

जिल्हा परिषदेत घोटाळे, गैरव्यवहार थांबता थांबेना; आता हा घोटाळा आला उघडकीस

sakal_logo
By
नीलेश डोये

नागपूर : जिल्हा परिषदेत घोटाळे, गैरव्यवहार थांबताना दिसत नाही. लाचप्रकरणात एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असताना आता खरेदीत घोटाळा झाल्याची चर्चा आहे. वित्त विभागाकडून परस्पर बॅंंग खरेदी करण्यात आली असून पदाधिकारी अनभिज्ञ आहेत. खरेदी संदर्भात वित्त,स्थायी किंवा सभेत विषय ठेवण्यात आला नसून चढ्या दराने खरेदी झाल्याची चर्चा आहे. वित्त विभागाकडून अनेक नियमबाह्य होत असल्याने विभागप्रमुख अडचणीत येणार असल्याचे बोलण्यात येते.

जिल्हा परिषदेमध्ये गेल्या काही वर्षांपासून अर्थसंकल्पाच्या वेळी सर्व सदस्यांना तसेच पंचायत समिती सभापतींना एक भेट वस्तू वितरण करण्यात येते. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वित्त सभापतींना आपला पहिलाच ‘अर्थसंकल्प’ सादर करता आला नाही. शासन निर्देशान्वये तत्त्कालीन सीईओंनीच अर्थसंकल्पाला मंजुरी प्रदान केली होती. अर्थसंकल्पाच्यावेळी सदस्यांना व पं.स.सभापतींनाही भेट वस्तू देण्याची असलेली परंपरा यंदाच्याही वर्षी कायम राहीली. यंदा भेट वस्तू म्हणून प्रवासाकरिता उपयुक्त असलेली ‘ट्राली बँग’ चे वितरण करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा - दोघांच्या सुखी संसारात तिसरीने केला प्रवेश; मग काय? वाचा पुढे...

परंतु या बँगचे वितरण हे अर्थसंकल्पानंतर नाही, तर नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेनंतर करण्यात आले. प्रत्येक सदस्यांना त्यांच्या घरी जाऊन बॅगचे वितरण करण्यात आले. अत्यंत गोपनियपध्दतीने हे वितरित करण्यात आली असल्याची माहिती आहे. ही खरेदी लाखोंच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. खरेदी असल्याने विषय वित्त,स्थायी किंवा सभेत येणे आवश्यक होता. परंतु पदाधिकाऱ्यांना डावलून ही खरेदी करण्यात आली. विशेष म्हणजे पंचायत समिती सभापती यांनाही बॅग देण्याची प्रथा आहे. परंतु त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे यात घोटाळा झाल्यीची चर्चा होत आहे.

पारशिवनी तालुक्यातील एका सदस्याला याचे वितरण झाल्यानंतर ही बाब अध्यक्षांच्या लक्षात आली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, वित्त सभापतींना याची कुठलिही माहिती नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. यावर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

loading image