esakal | सोन्याच्या दागिन्यांच्या टंचाईचे संकेत, मुहूर्तावर कसे मिळणार दागिने?
sakal

बोलून बातमी शोधा

gold rate

सोन्याच्या दागिन्यांच्या टंचाईचे संकेत, मुहूर्तावर कसे मिळणार दागिने?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क बंधनकारक (hallmark on gold jewelry) केल्याने त्यासाठी धावपळ वाढली आहे. सध्या एका दागिन्यांच्या हॉलमार्कसाठी चार ते पाच दिवस लागत आहेत. त्यामुळे नवनवीन डिझाईन्सचे दागिने शोरूममध्ये दर्शनीभागात ठेवण्यासाठी मर्यादा येऊ लागल्या आहेत. लग्नसमारंभ, दिवाळी आणि सणासुदीला दागिने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढते. तेव्हा दागिन्यांची टंचाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (scarcity of gold jwelry due to lack of hallmarking in nagpur)

हेही वाचा: 'ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला नाहीतर PM फंडमधून प्लांट का सुरू केले?'

आता १४, १८, २०, २३ आणि २४ कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असेल तरच त्यांची विक्री करता येणार आहे. दागिने क्षेत्रात विश्वासार्हता निर्माण व्हावी देशभर सोन्याच्या दागिन्यांच्या शुद्धतेत एकसमानता यावी यासाठी सरकारने हॉलमार्कची सक्ती केली आहे. याची अंमलबजावणी न केल्यास संबंधित सराफा व्यापाऱ्याला दागिन्यांच्या किमतीच्या पाचपट दंड अथवा एक वर्षाचा कारावास होण्याची तरतूद केलेली आहे. व्यापाऱ्यांनीही नियमानुसार नोंदणी करून हॉलमार्क घेण्यास प्रारंभ केला आहे. मात्र, शासकीय यंत्रणाच पंगू असल्याने सध्या एका दागिन्यांच्या हॉलमार्कसाठी तब्बल तीन ते चार दिवसाचा कालावधी लागतो आहे. त्यामुळे सोन्याचे दागिन्यांची श्रृंखला शोरूममध्ये ठेवण्यासाठी अडचणीचे जात आहे. सध्या सणासूदी व लग्नसराई नसताना एवढा कालावधी लागत आहे. तर लग्नसराई आणि सणासुदीच्या हंगामात ग्राहक मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने खरेदीसाठी गर्दी करतात. अशीच कमकूवत यंत्रणा राहिल्यास ग्राहकांना एका मुहूर्तावर खरेदी केलेला दागिना दुसऱ्या मुहूर्तावर मिळेल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हॉलमार्कचे आम्ही स्वागतच केले आहे. मात्र, प्रशासकीय यंत्रणाच सज्ज नसल्याने एका दागिन्यांच्या हॉलमार्किंगसाठी चार ते पाच दिवस लागत आहेत. अशीच स्थिती राहिल्यास सणासुदीचा हंगाम आणि लग्नसराईत दागिन्यांची मागणी वाढत असते. यंत्रणा अशीच राहिल्यास सोन्याच्या दागिन्यांची टंचाई नक्कीच जाणवेल.
-राजेश रोकडे, सचिव, सोना चांदी ओळ कमिटी
loading image