भाजपच नाही, सोनिया गांधींनीही शब्द दिला होता! २०२७ पूर्वी विदर्भ वेगळा होणार, विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केला विश्वास

Separate Vidarbha State Before 2027? | विदर्भातील सर्व खासदारांनी राजीनामे द्यावे अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने करण्यात आली. समितीचा संकल्प मेळावा पार पडला.
Separate Vidarbha State Before 2027

Separate Vidarbha State Before 2027

esakal

Updated on

नागपूर : केंद्रात आणि राज्यात सत्ता अल्यानंतरच स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती केली जाईल असे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी दिले होते. सोनिया गांधी यांनी तेलंगण निर्मितीच्यावेळी विदर्भाचाही विचार केला जाईल असा शब्द दिला होता. मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी वैदर्भीयांची फसवणूक केली. त्यामुळे विदर्भातील सर्व खासदारांनी राजीनामे द्यावे अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने करण्यात आली. समितीचा संकल्प मेळावा पार पडला. यात डिसेंबर २०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ मिळवणारच असा दावा माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com