
School bus and van collision at Manakapur Chowk, seven children injured, two critical.
Sakal
नागपूर: मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मानकापूर चौकात कल्पना टॉकीज जवळ शुक्रवारी सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास स्कुल बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाने स्कुल बसला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. अपघातात सात विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. चालकासह दोन मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.