RTE Admission Scam : एका प्रवेशासाठी शाहीद घ्यायचा एक लाख ; कार्यालयात आढळले पालकांच्या अर्जासहीत धनादेश

शाहीदच्या माध्यमातून १९ विद्यार्थ्यांनी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळांमध्ये प्रवेश घेतल्याचे समोर आले.
RTE Admission Scam
RTE Admission ScamSakal

नागपूर : आरटीई प्रवेशासाठी बोगस कागदपत्रे वापरल्या प्रकरणी मुख्य सूत्रधार शाहीद शरीफ याच्या कार्यालयावर धंतोली आणि सीताबर्डी पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना पालकांकडून घेतलेले धनादेश आणि आरटीई प्रक्रियेत भरलेले अर्ज सापडले.

शाहीद शरीफ आरटीईअंतर्गत एका प्रवेशासाठी एक ते दीड लाखांपर्यंत पैसे घेत असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. विशेष म्हणजे, जाफरनगर येथील घरात तपासणी केल्यावर पोलिसांना तलवार सापडली असून त्याविरोधात गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विस्तार अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीच्या अहवालानंतर सीताबर्डी पोलिसांनी १७ पालकांवर शनिवारी रात्री विस्तार अधिकारी हरडे यांनी तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यापूर्वी कागदपत्रांची तपासणी करीत असताना २०२३-२०२४ या कालावधीत शाहीदच्या माध्यमातून १९ विद्यार्थ्यांनी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळांमध्ये प्रवेश घेतल्याचे समोर आले.

शिक्षण विभागाने पालकांनी सादर केलेल्या दस्तऐवजांची तपासणी केली. पालकांनी सादर केलेले उत्पन्नाचे दाखले, जात प्रमाणपत्र व पत्त्यांमध्ये तफावत आढळली. ते बनावट असल्याचेही अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. विभागाने या १९ पालकांना कारणे दाखवा नोटीस बजावून सुनावणी घेतली.

बयाण व दस्तऐवजांमध्ये तफावत आढळल्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी व पडताळणी समितीचे सदस्य हरडे यांनी सीताबर्डी पोलिस ठाण्यांत तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान अशाच प्रकरणात सदर पोलिसांनी राजेश शिवपाल बुवडे (रा.अजनी) याला अटक केली. त्याची पोलिस कोठडी घेतली.

यावेळी चौकशीदरम्यान शाहीदने प्रवेश मिळवून दिल्याचे राजेशने सांगितले. त्यानंतर सदर, सीताबर्डी व धंतोली पोलिसांच्या संयुक्त पथकाने शाहीदच्या कार्यालयात छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, शाहीद यांनी पालकांकडून प्रवेशाच्या बदल्यात घेतलेले धनादेश आणि आरटीईसाठी केलेल्या अर्जाचाही प्रती या ठिकाणी आढळून आली. ते सर्व कागदपत्र जप्त केले. आता शाहीद शरीफ फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

शाळांवर आणायचा दबाव

आरटीई प्रवेश प्रक्रियेदरम्यान अर्ज भरून देण्याच्या नावावर पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप यापूर्वी शाहिद शरीफ यांच्यावर झाला होता. त्यानंतर तो समितीच्या कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याचेही आरोप काही विस्तार अधिकाऱ्यांनी केले होते. दरम्यान शरीफ हा समितीचा सदस्य असल्याचे सांगून शाळांवर प्रवेशासाठी दबाव आणत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com