
नागपूर : विदर्भात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती केवळ विदर्भापुरती मर्यादित नसून, तो संपूर्ण महाराष्ट्रात पसरल्याचा दावा करत, या प्रकरणाची राज्यव्यापी चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे उपनेते तथा आमदार कृपाल तुमाने यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना पत्र लिहिले आहे.