‘राष्ट्रवादी काँग्रेस फक्त पश्चिम महाराष्ट्राचा विचार करते’ हे विरोधकांचे राजकीय आरोप; गृहमंत्री असे का म्हणाले?

Sharad Pawar always worried about Vidarbha farmers
Sharad Pawar always worried about Vidarbha farmers

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस फक्त पश्चिम महाराष्ट्राचा विचार करते. विदर्भाला विकासापासून दूर ठेवते हे विरोधकांचे राजकीय आरोप असून त्यात काहीच तथ्य नाही. उलट शरद पवार यांनी सातत्याने विदर्भातील शेतकऱ्यांची चिंता केली, एवढेच नव्हेतर देशाचे कृषिमंत्री असताना त्यांनी भारताला अन्नधान्याच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण केल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त देशपांडे सभागृहात आयोजित केलेल्या व्हर्च्युअल रॅलीत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार प्रकाश गजभिये, दीनानाथ पडोळे, राकाँ अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद विद्रोही, ओबीसी विभागाचे ईश्वर बाळबुधे, शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, सरचिटणीस दिलीप पनकुले यांच्यासह विविध आघाड्या, सेलचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

राजकारणात पराभव न बघणारा नेता विरळाच आहे. संकट कुठलेही असू देत राज्यभरात धावून येणारे ते एकमेव नेते आहेत. देशात दुसरी हरितक्रांती आणण्याचे काम त्यांनीच केले. राजकारण, समाजकारण, क्रीडा, सांस्कृतिक, आपत्ती व्यवस्थापन अशा सर्वच क्षेत्रात काम करीत त्यांनी सर्वपक्षीयांशी संबंध कायम टिकविले, असेही देशमुख म्हणाले.

व्हर्च्युअल रॅलीत बोलताना राज्याचे जलसंपदा मंत्री जयंती पाटील यांनी पाच वर्षांत वैनगंगा ते नळगंगा प्रकल्प पूर्णत्वास नेऊन विदर्भ आणि मराठवाड्याला सुजलाम सुफलाम बनविण्याचे आश्वासन दिले. या प्रकल्पामुळे मुंबईला पाऊस पडूनही पाण्याविना असलेले तालुके जोडण्यात येणार आहे. त्यामुळे पिण्याची आणि शेतीच्या पाण्याची चिंता दूर होणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे नेते तसेच राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राज्यातील जनतेने शक्ती उभी केल्यास महाराष्ट्रातील ४८ खासदारांचे पाठबळ मिळाल्यास शरद पवार निश्चितच देशाचे नेतृत्व करतील अशी आशा व्यक्त केली.

यावेळी युवानेते जि. प. सदस्य सलील देशमुख, राजाभाऊ टांकसाळे, प्रशांत पवार, गटनेते दुनेश्वर पेठे, माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य, विशाल खांडेकर, महिला अध्यक्षा अलका कांबळे, नूतन रेवतकर, शैलेंद्र तिवारी आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com