नागपूर : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना विधानसभा निवडणुकीदरम्यान दोन व्यक्तींनी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरूनच राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे वर्धा येथील खासदार अमर काळे यांनीही धक्कादायक खुलासा केला आहे.