Physical Stores shopping
sakal
- कौस्तुभ चव्हाण
नागपूर - डिजिटल युगात ऑनलाइन शॉपिंगने नागरिकांचे जीवन सुलभ केले असले, तरी अलीकडच्या काळात युवकांमध्ये पुन्हा प्रत्यक्ष म्हणजेच फिजिकल शॉपिंगचा कल वाढताना दिसतो. ‘सकाळ’तर्फे करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली असून, विशेषतः जेन-झी पिढी ऑनलाइन शॉपिंगमधील फसवणूक आणि अतिरिक्त खर्चामुळे त्रस्त असल्याचे दिसून येते.