

Eknath Shinde Shiv Sena Nagpur Makes Major Organisational Move to Increase Party Strength and Expand Its Political Base
sakal
नागपूर: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने शहरात संघटनात्मक पुनर्रचना करीत एकाचवेळी सहा शहरप्रमुखांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दक्षिण-पश्चिम नागपूरची जबाबदारी सुमुख मिश्रा यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे. नागपूरचे संपर्कमंत्री संजय निरुपम यांच्या हस्ते नवनियुक्त शहरप्रमुखांना नियुक्तीपत्रांचे वितरण बुधवारी झालेल्या बैठकीत करण्यात आले.