
नागपूर : शिवसेनेने (शिंदे गट) नागपूर ग्रामीणमध्ये तीन जिल्हाप्रमुख नियुक्त केल्यानंतर आता नागपूर शहरासाठी दोन जिल्हाप्रमुखांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती आहे. सध्या शहरात एक जिल्हाप्रमुख असून, शहराचा विस्तार लक्षात आणखी एकाची नियुक्तीचा निर्णय घेण्याचे संकेत आहेत. दोन प्रमुखांकडे प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देऊन त्यांच्या नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढण्यात येणार असल्याचे समजते.