

Forest Rescue
sakal
ललित कनोजे
शितलवाडी (ता.रामटेक) : मुलीच्या घरी पाहुणी म्हणून आलेली आई चार दिवसांपासून अचानक निघून गेली. ती कुठे असणार, कशी असणार यांची चिंता वाटत असतानाच नातेवाईकांनी शोध सुरू केला. घनदाट जंगलात गावकऱ्यांच्या मदतीने बुधवारी चौथ्या दिवशी त्या सापडल्याने कुटुंबियांचे डोळे पाणावले. गीताबाई ताराचंद नागोसे (वय ७२) असे या महिलेचे नाव आहे.