esakal | शिवसेनेची एमआयएमसोबत हातमिळवणी; हिंदुत्व सोडल्याची भाजपची टीका

बोलून बातमी शोधा

asasuddin owaisi uddhav thackeray

अमरावतीमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षासोबत चक्क शिवसेनेनं हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे

शिवसेनेची एमआयएमसोबत हातमिळवणी; हिंदुत्व सोडल्याची भाजपची टीका

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

अमरावती- अमरावतीमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षासोबत चक्क शिवसेनेनं हातमिळवणी केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अमरावती महापालिलेच्या स्थायी समितीत शिवसेनेनं एमआयएमला पाठिंबा दिला आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेने एमआयएमला थेट तर मायावतींच्या बसपााला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली असून भारतीय जनता पक्षाने शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं अशी बोचरी टीका भाजपने केलीय. अमरावती महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजपाचे शिरीष रासने यांचा विजय झाला. त्यामुळे महापालिकेच्या चाव्या भाजपच्या हाती आल्या आहेत. पण, या निवडणुका एका अर्थाने वेगळ्या ठरल्या. निवडणुकीत रासने यांना 9 मते मिळाली, तर एमआयएमचे हुसेन मुबारक यांना 6 मते मिळाली. निवडणुकीत शिवसेनेनं थेट एमआयएमला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. भाजपने तर शिवसेनेवर हिंदुत्व सोडल्याचा घणाघाती आरोप केलाय. 

शिवसेना आणि एआयएमआयएम हे दोघेही कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर जहरी टीका याआधी केली आहे. पण, अमरावती महापालिलेच्या स्थायी समितीत शिवसेनेनं एमआयएमला पाठिंबा दिल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. शिवसेनेनं एमआयएमसोबत युती करुन हिंदुत्व सोडल्याचा प्रत्यय दिलाय, अशी बोचरी टीका भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली.  शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर जोपासलेलं हिंदुत्व शिवसेनेने सत्तेच्या लाचारीसाठी सोडलं, असंही ते म्हणाले.

"ठाकरे सरकारची वागणूक सचिन वाझेंचे प्रवक्ता असल्यासारखी"; भाजप...

अमरावती महापालिलेच्या स्थायी समितीत एकूण 16 सदस्य आहेत. यातील भाजप 8, युवा स्वाभिमान पक्ष 1 असे एकूण 9 सदस्य आहेत. विरोधात एमआयएम 2, शिवसेना 1,काँग्रेस 3, बसपा 1 असे एकूण 7 सदस्य आहेत. एमआयएमचे एफजल हुसेन मुबारक आणि भाजपचे सचिन रासने या दोघांमध्ये लढत होती. यात रासने यांनी बाजी मारली आहे.