Uddhav Thackeray : विदर्भात उद्धव ठाकरेंची तोफ आज धडाडणार

पक्षाची पुनर्बांधणी नागपुरातून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना देणार टिप्स
uddhav thackeray
uddhav thackerayesakal
Updated on

Nagpur : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा आजपासून सुरू झाला असून उद्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते कुणावर तोंडसुख घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे यांचे आज सकाळी नागपुरात आगमन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीत त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते यवतमाळकडे रवाना झाले. यवतमाळ, वाशिम, अकोला व अमरावतीनंतर उद्या, सोमवारी सायंकाळी सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात ते कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहे. राज्यातील सध्याचे फोडाफोडीचे राजकारण, उद्धव ठाकरेंची तोफ आज धडाडणार

अजित पवार यांच्या नेतृत्त्वात झालेले बंड आदीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील त्यांच्या दौरा महत्त्वाचा आहे. नागपुरात एकप्रकारे या बैठकीचे रुपांतर सभेत होण्याची शक्यता आहे. विदर्भात पक्षाची पुनर्बांधणी करण्यावर त्यांचा भर आहे. त्यामुळे नागपुरातील उद्या होणाऱ्या बैठकीत ते कुणाला लक्ष्य करणार, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. त्यांच्यासोबत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत आदी नेतेही उपस्थित राहणार आहेत.

आता विदर्भाचा पुळका आला- बावनकुळे

सत्तेत असताना अडीच वर्षाच अडीच दिवस मंत्रालयात जाण्यासाठी वेळ मिळाला नाही. आता तब्बल दोन दिवस विदर्भाचा दौरा करताहेत. मुख्यमंत्री असताना विदर्भातील जनतेची आठवण झाली नाही. आता मात्र पुळका आला. कितीही दौरे केले तरी तुमचे ढोंगी राजकारण जनता ओळखून आहे, अशी बोचरी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘ट्विट’ करीत केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.