राणा दाम्पत्याविरोधात सेनेची पोलिसात तक्रार; आंदोलनही केले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

navneet rana and ravi rana
राणा दाम्पत्याविरोधात सेनेची पोलिसात तक्रार; आंदोलनही केले

राणा दाम्पत्याविरोधात सेनेची पोलिसात तक्रार; आंदोलनही केले

नागपूर : खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्याविरोधात शहर शिवसेनेने आज नंदनवन पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविली. राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द वापरले तसेच राज्यातील वातावरण बिघडविल्याचा आरोप करीत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठणाचा हट्ट धरला. यातून संपूर्ण राज्याचे वातावरण बिघडले. हनुमान चालिसा पठणाची विनंती केली असती तर उद्धव ठाकरे यांनी परवानगीही दिली असती. परंतु राणा दाम्पत्यांना राज्याचे वातावरण बिघडवायचे होते.

संपूर्ण महाराष्ट्राला जेरीस आणत मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द बोलणाऱ्या नवनीत व रवी राणा यांच्याविरोधात आज संविधान चौकात शिवसेनेचे महानगर प्रमुख किशोर कुमारिया यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर नंदनवन पोलिस ठाण्यामध्ये दोघांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या दोघांनीही शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळेस चंद्रहास राऊत, दीपक कापसे, सुरज गोजे, प्रविण बर्डे, किशोर ठाकरे, राजेश कनोजिया, सुनिल बॅनर्जी, शंकर बेलखोडे, पुरुषोत्तम बन, राजेश गुजर, राजेश शिर्के, रमेश मोरे, मनोज साहू, महेंद्र कठाणे, रमेश पवार, दीपक पौनीकर, निलेश तिघरे, अनुराग लारोकर आदी उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena Lodges Police Complaint Against Rana Couple Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top