
नागपूर : घरामागील सेप्टिक टँकमध्ये बुडून तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कपिलनगर पोलिस ठाण्यांतर्गत घडली. भौमिक ब्रिजेश बिसेन (३) रा. समतानगर, नारी रोड असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. ब्रिजेश समतानगरच्या गुडलक सोसायटीमध्ये कुटुंबासह राहतात. सकाळी ९ वाजताच्या सुमारास भौमिक घरीच खेळत होता.