

Police investigation underway in Yavatmal after a shocking family murder case comes to light.
Sakal
ढाणकी (जि. यवतमाळ): पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड बंधाऱ्यात ताडपत्रीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळलेल्या त्या अज्ञात मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. मुलानेच आईच्या मदतीने वडिलांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह बंधाऱ्यात फेकला होता. बिटरगाव पोलिसांनी तांत्रिक तपास आणि शिलाई मशिनच्या एका लेबलवरून या गुन्ह्याचा छडा लावला आहे.