Gadchiroli News: गडचिरोलीतील धक्कादायक घटना! दीड तास रुग्णालयात विव्हळत होती जखमी महिला; अखेर झाला मृत्यू, नेमकं काय घडलं..

Gadchiroli Hospital Delay patient Death case: रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे अपघातग्रस्त महिलेचा मृत्यू; आमदारांचा कारवाईचा इशारा
Gadchiroli hospital under scrutiny after injured woman dies following alleged delay in treatment.

Gadchiroli hospital under scrutiny after injured woman dies following alleged delay in treatment.

sakal

Updated on

गडचिरोली : जिल्हा औद्योगिकदृष्ट्या वेगाने विकसित होत असला, तरी जिल्ह्यात रस्ते अपघात मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यातच अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने जीवसुद्धा गमवावा लागतो. अशीच घटना रविवार (ता. १८) घडली. अपघातग्रस्त महिला जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल दीड तास वेदनेने विव्हळत होती. पण उपचार सुरूच झाले नाहीत. अखेर तिची प्राणज्योत मालवली. दरम्यान आमदार डाॅ. मिलिंद नरोटे यांनी रुग्णालयाला भेट देत उपचारात हयगय करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com