
नागपूर : शिक्षकांच्या नियुक्त्या करीत, त्याच्या बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून शासनाला कोट्यवधीचा चुना लावणाऱ्या नीलेश वाघमारे याने आपल्या कार्यकाळात अनेक प्रताप केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या वाघमारे निलंबित असतानाही आपल्या नेटवर्कच्या माध्यमातून त्याचे काम सुरूच असल्याची माहिती आहेत. विशेष म्हणजे, बोगस नियुक्त्यांचे प्रकरण समोर येताच, शाळा संचालकांचे धाबे दणाणले आहेत. त्यातूनच अनेकांनी अधिकाऱ्यांशी भेटीसाठी मुंबईच्या वाऱ्या सुरू केल्या आहेत.