

fake Aadhaar used for Tadoba local quota safari
sakal
Tadoba Safari Scam : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात स्थानिक नागरिकांसाठी राखीव असलेल्या सफारी कोट्याचा गैरवापर करून बाहेरील पर्यटकांना प्रवेश मिळवून देणाऱ्या रॅकेटचा वन विभागाने पर्दाफाश केला आहे. बनावट आधारकार्ड तयार करून शासन आणि पर्यटकांची फसवणूक करणाऱ्या एजंट्सविरुद्ध मंगळवार (ता. ३०) दुर्गापूर पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.