नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे विविध विभागांमध्ये कामांसाठी कंत्राटी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. कर्मचारी कंपन्यांकडून लूट सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली..एकाच कर्मचाऱ्याला तीन ठिकाणी दाखवून विद्यापीठाकडून बिल मान्य करून घेण्यात आले, आर्थिक फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप आज अधिसभेच्या बैठकीत सदस्य ॲड. मनमोहन वाजपेयी यांनी केला. त्याची दखल घेत विद्यापीठाकडून सुरक्षा व्यवस्था पुरवणाऱ्या संस्थेचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला..अधिसभा बैठकीत, ॲड. वाजपेयी यांनी नागपूरच्या इतर अस्थापनांसह पुणे, जयपूर या शहरातही सुरक्षा कार्यात नोंद असलेल्या सुरक्षा रक्षकाची विद्यापीठातही हजेरी दर्शविल्याचे सांगितले. कंपनीने बनावट नोंदीद्वारे बिलांची उचल करून विद्यापीठाची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला..या कंपनीला काळ्या यादीत टाकून कंत्राट रद्द करण्याची मागणी सभेत केली. त्यावर कुलगुरू डॉ. बोकारे यांनी जून महिन्यात त्यांचे कंत्राट संपणार असून त्यानंतर त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल, असे स्पष्ट केले. यासह शासकीय कंपनी असलेल्या महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सची सेवा घेण्यात येईल, असेही सांगितले..दरम्यान विद्यापीठातील कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केलेल्या लिपिकांची सेवा बंद करावी, अशी मागणी ॲड. वाजपेयी यांनी केली. विद्यापीठात जवळपास १०० कंत्राटी लिपिकांची सेवा घेतली जात आहे. विद्यापीठात आधीच लिपिक व इतर संवर्गाची ४०० पदे मंजूर आहेत. प्रशासनाने जोरदार पाठपुरावा करून ही रिक्त पदे भरण्यासाठी सरकारकडे मागणी करावी, असे आवाहन त्यांनी केले..Planetary Conjunction : आकाशात ज्ञानयज्ञ सप्ताह! ग्रहाच्या युतीसह विविध खगोलीय घटना बघण्याची संधी .चौधरींनी करारच बदलला होतासध्या विद्यापीठाची सुरक्षा व्यवस्था नॅशनल प्रोटेक्टिव्ह या एजन्सीकडे आहे व त्यांचे १६० सुरक्षा रक्षक विविध विभागात तैनात आहेत. पूर्वीच्या कंत्राटानुसार संबंधित विभागप्रमुखाद्वारे रक्षकांच्या उपस्थितीचा समाधानकारक अहवाल मिळाल्यानंतरच कंपनीची देयके मंजूर करण्याची तरतूद होती. मात्र, तत्कालीन कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या काळात हा करार बदलण्यात आला. त्यानुसार विद्यापीठाचा एक व्यक्ती या रक्षकांच्या कार्यावर देखरेख ठेवून अहवाल देईल, अशी तरतूद करण्यात आली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.