

Disturbing Incident in Lonar: Woman and Two Daughters Found Dead
sakal
लोणार, (जि.बुलडाणा): लोणार तालुक्यातील वढव येथे सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी (ता. २४) रोजी दुपारी तीन वाजता घडली. कांचन अमोल सोनुने (रा. वढव, ता. लोणार, जि.बुलडाणा) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी माहेरच्या तक्रारीवरून पतीसह पाच जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.