Nagpur Crime : सीताबर्डी हत्याकांडात सख्ख्या भावांना जन्मठेप; चप्पलच्या दुकानावरून होता वाद
Nagpur Justice : सीताबर्डीतील चप्पल दुकानासमोरील वादात धारदार शस्त्राने हल्ला करीत खून करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाचा आदेश दिला.
नागपूर : सीताबर्डीतील चप्पलांच्या दुकानासमोरील फूटपाथच्या दुकानावरून झालेल्या वादात धारदार शस्त्राने वार करीत खून करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.