super 25 campaign
sakal
नागपूर - शहरात रस्त्यावर व सिग्नलवर भीक मागणाऱ्या मुलांचे भवितव्य बदलण्यासाठी लोकप्रिय आरजे मोना काळे हिने सुरू केलेली ‘सुपर २५’ मोहीम अशा मुलांसाठी आशेचा किरण ठरत आहे. बेघर व वंचित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नागपुरात हा अनोखा उपक्रम राबवण्यात असून यात अनेक संस्थांचा आणि नागरिकांचे उत्स्फूर्त सहकार्य मिळत आहे.