वर्धेतील नवरगाव सिंधुताईंची जन्मभूमी; जिल्ह्यात केले बरेच कार्य| Navargaon birthplace in Wardha | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sindhutai Sapkaal

वर्धेतील नवरगाव सिंधुताईंची जन्मभूमी; जिल्ह्यात केले बरेच कार्य

वर्धा : अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkaal) यांचे मंगळवारी रात्री उशिरा पुण्यात निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ७३ वर्षे होते. त्याचे कार्य देशपातळीवर असले तरी वर्धा जिल्ह्याशी असलेली नाळ ही वेगळीच आहे. सिंधुताई यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील नवरगाव (Navargaon birthplace in Wardha) येथे १४ नोव्हेंबर १९४७ रोजी झाला. येथूनच लग्नानंतर त्यांचा खडतर प्रवास सुरू झाला. त्यांचे मुख्य कार्य इतरत्र असले तरी माहेर असलेल्या या जिल्ह्यात त्यांनी बरेच कार्य केले.

नवरगाव येथे त्यांनी गोपिका गोरक्षण केंद्र (Gopika Gorakshan Kendra) सुरू केले. यातून त्यांनी गोपालनाचा संदेश दिला. वर्धेतील अनाथ मुलांसाठी त्यांनी अभिमान बालभवन सुरू केले. याशिवाय त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. वर्ध्यातील असलेल्या त्यांच्या नात्यामुळे त्यांच्या जाण्याने वर्धेकर दुःखात आहेत. सिंधुताई (Sindhutai Sapkaal) या वर्ध्यातील असल्याने त्यांनी शेवटचा बराच काळ वर्ध्यात घालवला. पिपरी (मेघे) येथे असलेल्या माई निवासात त्यांनी बराच काळ वास्तव्य होते.

हेही वाचा: सिंधुताई सपकाळ : मुलगी नको असल्याने आई-वडिलांनी ठेवले होते चिंदी नाव

... अन् त्या शाळेत जाऊन बसायच्या

वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी आहे. सिंधुताईंचे (Sindhutai Sapkaal) वडील अभिमान साठे गुरं वळायचे काम करीत होते. गाव लहान असल्यामुळे तेथे सुविधा उपलब्ध नव्हत्या. घरची गुरं राखायला म्हणून रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. मूळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत त्यांना शिकता आले.

हेही वाचा: माई गेल्याने महाराष्ट्र पोरका झाला : यशोमती ठाकूर

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top