एकल प्रभागाचा धोका कोणाला? काँग्रेस खुश, तर भाजप सावध

Congress-BJP
Congress-BJPe sakal

नागपूर : महापालिका निवडणुकीसाठी (Nagpur municipal corporation election) चारऐवजी एक नगरसेवकाचा प्रभाग (single ward system) केल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते खूश झाले आहेत. दुसरीकडे भाजप फायद्या-तोट्याची आकडेमोड करण्यात गुंतली आहे. ओबीसी आरक्षण, महागाई, इंधन दरवाढीमुळे थोडीफार नाराजी नागरिकांमध्ये दिसत असल्याने त्याचा फटका बसण्याचा धोका भाजपला आहे, तर काँग्रेसला फक्त अँटिइन्कबंसी हीच आशा वाटत आहे.

Congress-BJP
महापालिका निवडणूक : एक सदस्यीय प्रभाग पद्धतीत कोणाचा फायदा, कोणाचा तोटा?

निवडणूक जवळ आल्याने आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. नितीन गडकरी यांच्या वक्तव्याची री ओढून शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी पदवीधरप्रमाणे जनता भाजपला बक्षीस देणार असल्याचे सांगितले. प्रत्युत्तरात भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी पुन्हा एकदा पराभवासाठी तयार राहा, असे आव्हान काँग्रेसला दिले आहे. हा प्रचाराचा भाग असला तरी एकल प्रभागाचे काँग्रेसला जितके फायदे वाटत त्यापेक्षा अधिक अडचणीचेसुद्धा ठरू शकते. १५० पैकी पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. काँग्रेसच्या तुलनेत भाजपकडे सक्रिय महिला कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे. महिला आरक्षणामुळे काँग्रेसच्या चांगल्या तसेच निवडून येण्याची क्षमता असलेल्या इच्छुकांचा हिरमोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकल प्रभागामुळे दुसऱ्याच्या वॉर्डात घुसखोरी करणे सोपे नसते. आधी आपल्याच लोकांसोबत लढा द्यावा लागतो. याशिवाय ओबीसींसाठी प्रभाग आरक्षित राहण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे एससी,एसटी वगळता सुमारे सत्तर टक्के वॉर्ड खुले राहणार आहेत. त्यामुळे अपक्ष उमेदवारांची संख्या भरपूर राहणार आहे. खुल्या प्रभागात दोनचार हजार अनुसूचित जातीची मते असेल तर तेथे इच्छुक रिपाइंचे कार्यकर्त्यांच्याही उड्या पडणार आहेत. याचा फटका काँग्रेसला बसण्याची अधिक शक्यता आहे. जेवढा बंडखोरांचा धोका काँग्रेसला आहे त्या तुलनेत भाजपला नाही.

प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीतून अनेक दिग्गजांना डावलले आहे. यामुळे असंतोष उफाळून आला आहे. दुसरीकडे ठाकरे विरुद्ध राऊत असा परंपरागत लढा सुरूच आहे. तो निवळण्याचे कुठलीच चिन्हे सध्यातरी दिसत नाही. निवडणूक घोषित झाल्यावर पुन्हा एकमेकांच्या समर्थकांच्या तिकिटांची कापाकापी होणारच आहे. त्यात कोणाचा नंबर लागेल हे सांगता येत नसल्याने काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते धास्तावले आहेत.

फटका तरी सत्ता?

मनपात सत्तास्थापनेसाठी ७५ नगरसेवकांचे पाठबळ लागते. सध्या भाजपचे १०८ नगरसेवक आहेत. नाराजी, निष्क्रियतेमुळे २५ ते ३० नगरसेवकांना पराभवाचा फटका बसू शकतो. तरी सत्ता भाजपची बसते. काँग्रेसकडे फक्त आरोपांचे एकमेव अस्त्र आहे. काँग्रेसने कितीही नाकारले तरी झालेला विकास सर्वांना दिसतच आहे. ही भाजपची जमेची बाजू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com