Marathi Literature : अ. भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदावर पुरुषांचीच मक्तेदारी; अठ्ठ्याण्णव संमेलने, महिला अध्यक्ष केवळ सहा!
WomenIn Literature : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ९८ व्या अधिवेशनात महिला अध्यक्ष म्हणून डॉ. तारा भवाळकर यांची निवड होईल, यामुळे एक इतिहास रचला जात आहे. मात्र, ९७ संमेलनांच्या प्रदीर्घ कालावधीत केवळ सहा महिला अध्यक्ष बनल्या आहेत, यावर महिला साहित्यिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
नागपूर : संसदेत महिलांना तेहतीस टक्के आरक्षणाची ग्वाही देणाऱ्या ''नारी शक्ती विधेयका''ला नवीन संसदभवनात सर्वानुमते मंजुरी मिळाली. सर्वच राजकीय पक्षांचा महिलांविषयीचा आदर यातून दिसून येतो.