esakal | नागपुरातील १६ खासगी रुग्णालये झाले ‘कोविड हॉस्पिटल्स’; तब्बल इतके बेड्‌स राहणार
sakal

बोलून बातमी शोधा

Sixteen private hospitals in Nagpur become Covid Hospitals

सरकारच्या परिपत्रकानुसार ८० टक्के बेड्‌स हे आरक्षित ठेवावे आणि त्यावर सरकारने निर्धारित केलेल्या दरानुसारच बिल आकारावे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना हे बेड्‌स पूर्ण होईपर्यंत तेथेच दाखल करावे. त्यानंतरच २० टक्के बेड्‌स ज्यावर रुग्णालयाच्या दरानुसार बिल आ

नागपुरातील १६ खासगी रुग्णालये झाले ‘कोविड हॉस्पिटल्स’; तब्बल इतके बेड्‌स राहणार

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : शहरातील वाढती रुग्ण संख्या पाहता शासकीय रुग्णालयांसोबतच आता कोविड-१९च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांनाही मान्यता देण्यात आली आहे. नागपुरातील १६ खासगी रुग्णालये आता पूर्णतः कोविड हॉस्पिटल्स बनले आहेत. या रुग्णालयांत एकूण १,८७६ बेड्‌स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासंदर्भातील आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व रुग्णालयांचे स्वतंत्र आदेश काढून रुग्णालयांना कोविड हॉस्पिटल म्हणून मान्यता दिली आहे. या रुग्णालयांमध्ये एकूण १,८७६ बेड्‌सची उपलब्धता आहेत. यामध्ये २५६ बेडस्‌ अतिदक्षता कक्षातील आहेत. ऑक्सिजनची उपलब्धता असलेली ९९७ बेड्‌स आहेत तर ६२३ ऑक्सिजन नसलेले बेड्‌स आहेत. संपूर्ण रुग्णालय मिळून एकूण ९० व्हेन्टिलेटरची व्यवस्था आहे.

हेही वाचा - नागपूर ग्रामीण ब्रेकिंगः अखेर विहिरीत पडलेला एक मूषक ठरला ‘त्या’ तिघांचा काळ ...

सरकारच्या परिपत्रकानुसार ८० टक्के बेड्‌स हे आरक्षित ठेवावे आणि त्यावर सरकारने निर्धारित केलेल्या दरानुसारच बिल आकारावे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना हे बेड्‌स पूर्ण होईपर्यंत तेथेच दाखल करावे. त्यानंतरच २० टक्के बेड्‌स ज्यावर रुग्णालयाच्या दरानुसार बिल आकारता येईल, तेथे दाखल करावे.

हे राहतील आता कोविड हॉस्पिटल

ज्या खाजगी १६ हॉस्पिटल्सना कोविड हॉस्पिटल म्हणून मान्यता मिळाली यामध्ये ऑरेंज सिटी हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, सावरकर चौक (१५० बेड्‌स), सेव्हन स्टार हॉस्पिटल, जगनाडे चौक (१०५), श्री भवानी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, पुनापूर (११०), गंगा केअर हॉस्पिटल, रामदासपेठ (१०५), श्री राधाकृष्ण हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, पूर्व वर्धमान नगर (१५०), लता मंगेशकर हॉस्पिटल, सीताबर्डी (१५०), कुणाल हॉस्पिटल, मानकापूर (१००), होप हॉस्पिटल, टेका नाका (१००), सेंट्रल हॉस्पिटल, रामदासपेठ (५०), वोक्हार्ट हॉस्पिटल, गांधीनगर (४५), रेडिअन्स हॉस्पिटल, वर्धमाननगर (६५), वोक्हार्ट हॉस्पिटल, नॉर्थ अंबाझरी रोड (११८), किंग्जवे हॉस्पिटल, कस्तुरचंद पार्क जवळ (२२८), अलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मानकापूर (२००), न्यू एरा हॉस्पिटल, टेलिफोन एक्स्चेंज चौक (१००), व्हिम्स हॉस्पिटल (१००) या रुग्णालयांचा समावेश आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top