

Nagpur News
sakal
नागपूर : नागपूर शहराचा सतत वाढणारा विस्तार, वाढती लोकसंख्या, गगनाला भिडलेल्या घरांच्या किमती या सर्वांमुळे झोपडपट्ट्यांचे जाळे दिवसेंदिवस गहिरे होत चालले आहे. सध्या शहरात तब्बल ४२६ झोपडपट्ट्या अस्तित्वात असून यापैकी २९८ घोषित तर १२८ अघोषित झोपडपट्ट्या असल्याची अधिकृत नोंद आहे.