छोट्या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनातून दुष्काळावर मात शक्य

Nitin-Gadkari
Nitin-GadkariNitin-Gadkari

नागपूर : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आजही पाण्याची समस्या गंभीर आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी वेळेवर आणि मुबलक पाणी मिळाले तर महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करणार नाही आणि जलसिंचनाचे छोटे छोटे प्रयोग गावागावांत यशस्वी झाले तर महाराष्ट्रावर असलेले दुष्काळाचे संकट दूर करता येईल. त्यामुळे वर्षानुवर्षे रखडत राहणाऱ्या मोठ्या प्रकल्पाच्या मागे लागण्यापेक्षा गावातील छोटे प्रकल्प पुनरुज्जीवित करा. त्यात ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वर्धा जिल्ह्यातील जलसिंचन प्रयोगाच्या पाहणी दौऱ्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केले.

पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील मांडवा गावात जवाहर नेहरू पोर्ट ट्रस्टच्या सीएसआर फंडातून बंधारा निर्मिती आणि बजाज फाउंडेशनच्या सहकार्याने करण्यात येत असलेल्या येळकेळी येथील धाम नदीच्या उनई बंधाऱ्याच्या कामाची तसेच मांडवा येथील मोतीनाला प्रकल्पाची गडकरी यांनी पाहणी केली.

Nitin-Gadkari
...अन् पतीने फोडला हंबरडा; अपघातात गर्भवतीसह बाळाचा अंत

धाम नदीपात्र खोलीकरण रुंदीकरण प्रकल्पांमुळे सुमारे ३० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. तर मांडव गावातील बंधाऱ्यामुळे सहा गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल. याशिवाय दोन हजारच्या वर शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध होणार असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. केंद्रीय मंत्री असल्याने देशोदेशी करण्यात येणाऱ्या दौऱ्यात महाराष्ट्राच्या विदर्भातून आलो असल्याचे सांगितल्यावर शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भ का, असा प्रश्न विचारला जातो, त्यावेळी वाईट वाटत असल्याची खंत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.

छोट्या प्रकल्पात गावे समृद्ध करण्याची ताकद आहे, त्यामुळे त्यावर भर द्या. शेतकरी सुखी, समृद्ध झाला तरच आपण समृद्ध होऊ. गावागावांतील लोकांनी एकत्र येऊन श्रमदानातून पाण्याची समस्या सोडवली तर गावाचे अर्थकारण बदलू शकते. गावातील पाण्याची समस्या दूर झाली तर गरिबी, भूकमारी, बेरोजगारी यांसारख्या अनेक समस्या सुटू शकतील. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि जनतेनी याकडे लक्ष देण्याचे आवाहनही गडकरी यांनी केले. यावेळी त्यांच्या सोबत वर्धेचे खासदार रामदास तडस, आर्वीचे आमदार दादाराव केचे, विधान परिषदेचे आमदार रामदास आंबटकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Nitin-Gadkari
राजकीय हत्यार म्हणून इडी, आयटीचा वापर; रोहित पवारांचा वार

शेतकऱ्यांनो, ऊस शेतीकडे वळा

यावर्षी झालेल्या अतिपावसामुळे कापूस, सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गेल्यावर्षीसुद्धा काही निराळे चित्र नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक संपन्नता देणाऱ्या उस उत्पादनाकडे वळले पाहिजे. उसाच्या मळीपासून इथेनॉलनिर्मिती होते. आगामी काळात इथेनॉल पेट्रोल-डिझेलला उत्तम पर्याय ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो कापूस, सोयाबीन सोडा आता ऊसशेतीकडे वळा, असे आवाहन गडकरी यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com