CM Devendra FadnavisSakal
नागपूर
CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग
Transforming Rural Maharashtra: गावाचे ‘रोल मॉडेल’ उभे राहिले असून लवकरच राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील १० गावे स्मार्ट व इंटेलिजंट करण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले. याद्वारे पहिल्या टप्प्यात राज्यातील जवळपास तीन हजार ५०० गावे स्मार्ट व इंटेलिजंट करणार आहे.
नागपूर : आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पुढे जात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून शेती, आरोग्य, शिक्षण अशा महत्त्वाच्या सुविधा सातनवरी गावात उपलब्ध करून देत समृद्ध गावाचे ‘रोल मॉडेल’ उभे राहिले असून लवकरच राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील १० गावे स्मार्ट व इंटेलिजंट करण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले. याद्वारे पहिल्या टप्प्यात राज्यातील जवळपास तीन हजार ५०० गावे स्मार्ट व इंटेलिजंट करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.