नागपूर : आम्ही कधी वापरायचे स्ट्रीट व्ह्यू? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Google Street View

नागपूर : आम्ही कधी वापरायचे स्ट्रीट व्ह्यू?

नागपूर : नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी असताना मुंबईसोबत नाशिक, अहमदनगर, पुणे या तीन शहरांचा नंबर गुगल स्ट्रीट व्ह्यूसाठी लागला, परंतु नागपूर शहराचा नाही. त्यामुळे गुगल मॅपचा वापर नियमित करणाऱ्या मोठ्या वर्गाच्या आनंदावर विरजण पडले आहे.

एखाद्या मित्राच्या घरी जायचे असेल तर त्याला आधी आपण `करंट लोकेशन पाठव`, असे म्हणतो. ते लोकेशन गुगल मॅपमध्ये असते. लोकेशनवरून नियोजित ठिकाणी जाणे अगदीच सोपे होते. ज्यांच्याकडे स्मार्ट फोन आहे त्यातील बहुतेक जण लोकेशन मागवूनच त्या ठिकाणी जाणे पसंत करतात. गुगलने या मॅपमध्ये स्ट्रीट व्ह्यू नावाचे नवीन फीचर आणले जे आपल्या देशातील आयटी हब म्हणून ख्याती असलेल्या बंगळूर शहरात नुकतेच सुरू झाले आहे. त्यानंतर आणखी टप्प्प्याटप्प्याने देशातील दहा शहरांमध्ये हे फीचर वापरणे शक्य होईल. यात नागपूर शहराची निवड न झाल्याने नागपूरकर या फीचरला मुकणार आहेत.

स्ट्रीट व्ह्यू या पर्यायाचा वापर गुगल मॅपमध्ये केल्यास आपण पुढे पुढे जात असताना रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या इमारती, दुकाने, झाडे, फलके प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांपुढून मोबाईलवर पुढे पुढे सरकत जातील. आपल्याला उघड्या डोळ्यांनी जे पुढे दिसते, तेच मोबाईवरून सरकत जात असताना एक वेगळाच रोमांच अनुभवता येणार आहे.

१७ लाखांहून जास्त वाहने, तरी...

नागपूरमध्ये वाहनचालकांची मोठी संख्या आहे. शहराचे क्षेत्रफळ २१८ वर्ग किमी आहे. दीर्घ लांबीचे रस्ते आहेत. लोकसंख्याही तब्बल तीस लाखाच्या घरात असून वाहनांची संख्या तब्बल १७ लाख आहे.छायाचित्रकारांना मिळाले असते काम निवड झालेल्या शहरात स्थानिक छायाचित्रकारांच्या मदतीने गुगलने छायाचित्रण केले. नागपूर शहराची निवड झाली असती तर शहरातील छायाचित्रकारांना काम मिळाले असते. त्या बदल्यात रग्गड रक्कम मिळाली असती.

अनेक सेवांचे माहेरघर असूनही

नागपूर शहरातील खासगी आणि सार्वजनिक आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र नजीकच्या मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात लोक सतत येतात. शिवाय विविध वस्तू, साहित्य, खाद्य आदी घरपोच पुरविणाऱ्या विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सेवाही नागपूर शहरात सुरूच आहेत. शिवाय शहरात विविध शैक्षणिक संस्था, आरोग्य संस्था आहेत. बुटीबोरी आणि हिंगणा या दोन मोठ्या एमआयडीसी आहेत. अनेक राष्ट्रीय कंपन्यांची विभागीय मुख्यालये नागपूर शहरात आहेत. ही सगळी पार्श्वभूमी पाहता नागपूर शहरातील विविध स्थळे गुगुल मॅपवर सर्च करण्याचे मोठे प्रमाण आहे. नागपूरचाही नंबर लागला असता तर युजर्स सुखावले असते.

मी सतत गुगल मॅपचा वापर करतो. त्यामुळे हे फीचर मला नागपूर शहरात मिळाले असते, तर अपूर्व आनंद अनुभवता आला असता. गुगलने लवकरात लवकर आमच्या शहराला हे फीचर वापरण्यासाठी उपलब्ध करून द्यावे.

- दीपक साने, खासगी वाहनचालक संघटना

Web Title: Smart Phone Google Street View Map Current Location Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NagpurmapGoogle map