आता प्रदूषण होणार कमी, ‘स्‍मार्ट ट्री’ गिळणार हवेतील धुळ!

smart tree
smart treee sakal

नागपूर : शहरातील प्रदूषण (pollution in nagpur) नियंत्रणासाठी ‘नीरी’ (NEERI) महापालिकेला (Nagpur municipal corporation) सहकार्य करीत असून आता नवीन ‘स्मार्ट ट्री’ (smart tree for reducing pollution) तयार करण्यात आले आहेत. महापालिकेकडून ते चौक, उद्यानांमध्ये लावण्यात येणार आहे. या ‘स्मार्ट ट्री’ द्वारे हवेतील धुरांच्या कणांवर नियंत्रणात येणार असून प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. हिरवेगार असलेल्या संत्रानगरीच्या वैभवात ‘स्मार्ट ट्री’ आणखी भर पडणार आहे. (smart tree will reduce air pollution in nagpur)

smart tree
थरार! ‘ती’ चिरलेल्या गळ्यासह दुचाकीवर बसून गेली रुग्णालयात

शहरातील वायु प्रदूषण कमी करण्यासाठी मनपा व नीरी संयुक्तपणे काम करीत आहे. नीरीने यंदाही शहराचा पर्यावरण अहवाल तयार केला. महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह उपमहापौर मनिषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे व कार्यकारी अभियंता (पर्यावरण) श्वेता बॅनर्जी यांनी ‘नीरी‘ला भेट दिली. यावेळी नीरीच्या संशोधकांनी ‘स्मार्ट ट्री’बाबत माहिती दिली. एवढेच नव्हे तर महापौर तिवारी व इतर पदाधिकाऱ्यांनी ते बघितले. मेट्रोने ज्याप्रमाणे हॉटेल प्राइड तसेच इतर भागात पिलरवर व्हर्टिकल गार्डन तयार केले, त्याचप्रमाणे हे ‘स्मार्ट ट्री’ तयार करण्यात आल्याचे सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी सांगितले. या ‘स्मार्ट ट्री’ मध्ये वेगवेगळ्या प्रजातीची रोपटे लावण्यात आली. ही रोपटी वातावरणातून धुळीचे कण शोषून घेतात. त्यांच्यावर ‘स्मार्ट ट्री’ चाच एक भाग असलेल्या शॉवरमधून पाण्याचे फवारे सोडले जातात. परिणामी धुळीचे कण खाली बसतात. अशाप्रकारे वातावरणातील धुळीवर नियंत्रण येणार आहे. शहरातील चौक तसेच उद्यानांमध्ये ‘स्मार्ट ट्री’ लावण्याची इच्छा महापौरांनी व्यक्त केली. याशिवाय ग्रीन दहन घाटाच्या माध्यमातून शहरातील वायु प्रदूषण कमी होऊ शकते. यावेळी नीरीचे प्रमुख वैज्ञानिक डॉ. पद्मा राव, डॉ. आत्या कपले, डॉ. रीता धापोडकर, डॉ. संगीता गोयल, डॉ. साधना रायलू, डॉ. अतुल वैद्य, डॉ. बिनीवाले आणि डॉ. लालसिंह उपस्थित होते.

  • एका ‘स्मार्ट ट्री’ ची किंमत सहा लाख

  • वायुप्रदुषण कमी होण्यास मदत

  • उन्हाळा, हिवाळ्यात सर्वाधिक प्रभावी

  • अस्थमा रुग्णांना मिळेल दिलासा

  • ‘स्मार्ट ट्री’ मुळे शहराच्या सौंदर्यातही पडेल भर

  • नागपूरसह अन्य शहरांसाठीही अनुकरणीय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com