नागपूर - शहरातील विविध ठिकाणी टेक्सास स्मोकच्या नावाने हुक्का पॉट आणि त्याच्या माध्यमातून सुगंधीत तंबाखूची विक्री करणारा सुत्रधाराचा गुन्हेशाखेच्या पथकांनी पर्दाफाश केला आहे. ऑपरेशन थंडरच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या अभियानातून गुन्हेशाखेच्या विविध पथकांनी वाठोड्यासह गोदाम आणि शहरातील १४ विविध प्रतिष्ठान आणि तीन गोदामांवर छापा टाकून ४३ लख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच सुत्रधारासह २६ जणांना अटक केली.