esakal | नागपूर : दारासमोरच फलाटावर भला मोठा साप; तोंडून निघाली किंकाळी
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर : दारासमोरच फलाटावर भला मोठा साप; तोंडून निघाली किंकाळी

नागपूर : दारासमोरच फलाटावर भला मोठा साप; तोंडून निघाली किंकाळी

sakal_logo
By
योगेश बरवड

नागपूर : धो धो पाऊस कोसळत असतानाच ट्रेन स्थानकावर येऊन थांबली. प्रवासी चढण्या-उतरण्याच्या तयारीत असतानाच दारासमोरच फलाटावर भला मोठा साप दिसला. एकदम अनेकांच्या तोंडून किंकाळी निघाली. सारेच भयभीत असतानाच लोहमार्ग पोलिस दलातील शिपाई श्रीकांत उके घाईघाईत पोहोचले आणि सापाला अलगद उचलून घेतले. हा थरारक प्रसंग सोमवारी रात्री अजनी स्थानकावर घडला. (Snake-News-Nagpur-Railway-Station-Citizens-scared-nad86)

सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस धडधड करीत अजनी स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर येऊन थांबली. आतील प्रवासी खाद्य पदार्थ घेण्यासाठी खाली उतरले. तर बाहेरचे प्रवासी आत चढत होते. एस-११ क्रमांकाच्या डब्यातील प्रवासीही खाली उतरण्याच्या बेतात असताना. समोरच भला मोठा साप दिसला. अनेकांनी आरडाओरड केली. तर, उत्सुकता आणि भीतीपोटी काहीजण डब्याबाहेर पडले.

हेही वाचा: सत्तांतरानंतर प्रश्न रखडला; पाच एव्हरेस्टवीर नोकरीच्या प्रतीक्षेत

काहींनी सापाला तिथून घालविण्याचा बराच खटाटोप केला. पण, तो जागचा हलतही नव्हता. घटनेची माहिती मिळताच स्टेशन व्यवस्थापक माधुरी चौधरी यांनी सर्पमित्र आणि पोलिस शिपाई श्रीकांत उके यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. घटनेची माहिती दिली. दहा मिनिटाच्या आत श्रीकांत स्टेशनवर पोहोचले. क्षणाचाही विलंब न करता सापाला पकडून प्रवाशांना दिलासा दिला.

श्रीकांत उके अजनी लोहमार्ग पोलिस ठाण्यात नियुक्त आहेत. सर्पमित्र म्हणून ते नागरिकांच्या मदतीला धावून जातात. पकडलेला साप डुरक्या घोणस जातीचा असून अजनी रेल्वे स्थानक परिसरात त्याचे विपुल स्वरूपात वास्तव्य आहे. श्रीकांत यांना विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.

(Snake-News-Nagpur-Railway-Station-Citizens-scared-nad86)

loading image