
नागपूर : २१ व्या शतकात देश पुढे नेताना राज्यातील विविध भागात होत असलेल्या परिषदांचे आयोजन हे शासनाच्या योजनांसाठी महत्त्वपूर्ण आहे. या परिषदांतून निघणारे निष्कर्ष, माहिती ही विकसित देश घडविण्यात मोलाची भूमिका बजावणारे आहेत. शासनाच्या विविध योजना व उपक्रम राबविताना याची निश्चितच दखल घेण्यात येईल, असे प्रतिपादन महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवार (ता.२९) रोजी केले.