esakal | पाकिस्तानमध्ये दोघांचा कोरोना रिपोर्ट आला निगेटिव्ह अन्‌ आनंदात असं केल्याने गेला पाच जणांचा जीव!
sakal

बोलून बातमी शोधा

social media jokes on coronavirus

जितके दिवस तुम्ही शांत पणे घरी राहाल, 
तितक्‍या लवकर तुम्हाला बारमध्ये बसता येईल... 

पाकिस्तानमध्ये दोघांचा कोरोना रिपोर्ट आला निगेटिव्ह अन्‌ आनंदात असं केल्याने गेला पाच जणांचा जीव!

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : कोरोना... कोरोना... कोरोना... आजघडीला जगात सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे कोरोना. चीनमधून आलेल्या कोरोना विषाणूने जगात थैमान घातला आहे. 7,99,723 लोकांना कोरोनाची लागण झाली असताना तब्बल 38,732 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, नेटकऱ्यांवर याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही आहे. सोशल मीडियावर जोक्‍सचा धुमाकूळ घालवून एकप्रकारे कोरोना विषाणूला पळवून लावण्याचा प्रयत्न नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे. 

"पाकिस्तानमधील दोन लोकांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला, आनंदाच्या भारात नातेवाईकांनी गोळीबार केला, यात पाच जणांचा मृत्यू झाला', "भूकंप आला तर घराबाहेर पडायचे की घरातच राहायचे', "बात करने से बात बढ जाती है, इसलीए अब मै खामोश रहता हूं...' असे एक ना अनेक जोक्‍स सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. इतक्‍या कठीण परिस्थितीतही हे जोक्‍स हसायला भाग पाडत आहेत. 

रमेश - सुरेश कुठे चालला तू 
सुरेश - यार घरी चोरी झाली ना... पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात आहे. 
रमेश - अबे... देशात लॉकडाऊन सुरू आहे... पोलिस विचारतील तू कुठे गेला होता, मग...? 
सुरेश - हो यार... जाऊ दे तक्रारच करीत नाही. 

पूर्वी शिंक आली की, म्हणायचे सत्य आहे... 
आता आली की लगेच म्हणतात... उठ इथून...
 

कोरोनामुळे बाहेर देशातील बायकांना टेन्शन आपण जगू की मरू?
पण, आपल्या महाराष्ट्रातील बायकांनी वर्षभराचे पापड पण करून ठेवले... 

शौच से आने के बाद ही हाथ नहीं धोना है, 
शौच जाने के पहले भी हाथ धोईएगा, 
कोरोना व्हायरस का क्‍या है?, 
वो तो कहीं से भी अंदर घुस जाएगा... 

पुरी जिंदी कमाकर यदी 20 दिन का जुगाड नही कर पाए, 
तो 20 दिन में कमाकर क्‍या महल खडा कर लोगे, 
सरकार को सहयोग करें, घर पर रहें, सुरक्षित रहें...

जितके दिवस तुम्ही शांत पणे घरी राहाल, 
तितक्‍या लवकर तुम्हाला बारमध्ये बसता येईल... 

बायको - अहो हे घ्या दोनशे रुपये, 
नवरा - कशासाठी 
बायको - जा कॉर्टर घेऊन या 
नवरा - अग लॉकडाऊन आहे ना... विसरली का? 
बायको - मरो तुमचा लॉकडाऊन, दारूच्या वासाच्या सवयीमुळे आठ दिवस झाले झोप येत नाही... 

आज सुबह करण जोहर ने काजोल को फोन लगाया था... 
काजोल बहुत खुश हुई, 
उसको लगा करण उसको नई फिल्म ऑफर कर रहा है... 
उसका भ्रम तब तुटा, जब करण ने कहा, 
अजय से पुछ "विमल' पडी है क्‍या...?

loading image