

Nitin Gadkari Says He Serves Everyone, Regardless of Votes
Sakal
नागपूर: महाल परिसरातील लहानपणाच्या आठवणींपासून शहराच्या भविष्यातील विकासदृष्टीपर्यंत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरशी असलेले आपले भावनिक नाते, वैयक्तिक जीवनातील शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि शहराच्या परिवर्तनाचा प्रवास मनमोकळेपणाने उलगडून दाखविला. राजकारण नाही, समाजकारण माझा आत्मा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.