esakal | कौतुकास्पद! सामान चढवताना अचानक घसरला वृद्धाचा पाय; आरपीएफ जवानानं वाचवला जीव

बोलून बातमी शोधा

कौतुकास्पद!  सामान चढवताना अचानक घसरला वृद्धाचा पाय; आरपीएफ जवानानं वाचवला जीव
कौतुकास्पद! सामान चढवताना अचानक घसरला वृद्धाचा पाय; आरपीएफ जवानानं वाचवला जीव
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : चालत्या ट्रेनमधून उतरणे किंवा चढणे जीवघेणे ठरू शकते, याची पुरेपूर कल्पना असूनही अनेकजण ते धाडस करताना दिसतात. गुरुवारी सकाळी कामठी स्टेशनवरून रवाना झालेल्या रेल्वेत चढण्याच्या प्रयत्नात वृद्ध प्रवासी खाली पडले. गाडीसोबत फरफटत जात होते. ते गाडीखाली येणार तोच आरपीएफ जवान देवदुताप्रमाणे धावून आला. शर्थिचे प्रयत्न करीत त्यांना जीवनदान दिले.

हेही वाचा: रक्षकच बनले भक्षक! चक्क डॉक्टरनेच लपवला रेमडेसिव्हिरचा साठा; चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार

दुर्गाप्रसाद सराफ (६८) रा. लालाओळी, कामठी असे प्राण वाचलेल्या सुदैवी प्रवाशाचे नाव आहे. त्यांना शेगावला जायचे होते. गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसचे तिकीट असल्याने जीवलग मित्राला सोबत घेऊन नियोजित वेळेपूर्वीच ते कामठी स्टेशनवर पोहोचले. महाराष्ट्र एक्स्प्रेस कामठीच्या फलाट क्रमांक २ वर येऊन थांबताच त्यांना जवळचे सामान आत टाकणे सुरू केले.

नियोजित वेळेनुसार अगदी दोनच मिनिटात ट्रेन सुरू झाली. सामान टाकण्यात त्यांना उशीर झाला. गाडी चालू लागल्यानंतर त्यांनी आत चढण्याचा प्रयत्न केला. पण, पाय घसरल्याने ते खाली पडले आणी ट्रेनसोबत फरफटत जाऊ लागले. ते गाडीखाली खेतले जाणार तोच कर्तव्यावर हजर असलेले जवान ईशांत दीक्षित यांचे लक्ष केले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली. जवळ जाताच झडप घालून त्यांना पकडून घेतले. ते व्यवस्थित बाहेर येईपर्यंत आपल्याकडे ओढून ठेवले.

हेही वाचा: 300 वर्षांची परंपरा असलेली गळाची रथयात्रा कोरोनाने केली खंडित; गर्दी न करण्याचं आवाहन

हा प्रसंग बघणाऱ्या प्रत्येकाच्या छातीत धस्स झाले. पण, प्रवासी सुखरूप बचावल्याचे बघून साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला. घटनेच्या वेळी सराफ यांचे मित्र सूर्यकांत शर्मा हेसुद्धा तिथेच होते. त्यांनी तातडीने पुष्पगुच्छ बोलावून घेत जवान दीक्षित यांचे कौतूक करीत आभारही मानले.

संपादन - अथर्व महांकाळ