esakal | 300 वर्षांची परंपरा असलेली गळाची रथयात्रा कोरोनाने केली खंडित; गर्दी न करण्याचं आवाहन

बोलून बातमी शोधा

300 वर्षांची परंपरा असलेली गळाची रथयात्रा कोरोनाने केली खंडित; गर्दी न करण्याचं आवाहन
300 वर्षांची परंपरा असलेली गळाची रथयात्रा कोरोनाने केली खंडित; गर्दी न करण्याचं आवाहन
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वर्धा : जिल्ह्यातील आध्यात्मिक व धार्मिकदृष्टीने अतिशय महत्त्वाची समजली जाणारी व गत 300 वर्षांची परंपरा असलेली पवनूर येथील चैत्र महिन्यातील चैत्र कृष्णपंचमीला भरणारी प्रसिद्ध गळाची यात्रा यंदा कोरोनाच्या हाहाकाराने स्थगित करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

हेही वाचा: नागपुरात फिरती कोविड चाचणी प्रयोगशाळा सुरू; नितीन गडकरींच्या हस्ते उद्‍घाटन; २४ तासाच देणार अहवाल

दरवर्षी ग्रामस्थांच्या सहभागातून गळाची रथयात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हनुमान जयंती ते पंचमी पर्यंत या गळाच्या रथयात्रा चे आयोजन केले जाते. ही गळाची रथयात्रा चैत्र कृष्ण पंचमीला गत 300 वर्षांपासून अखंड सुरू आहे. यावर्षी 2 मे रोजी यात्रेचे नियोजन परंपरेनुसार करण्यात आले असतानाच ही परंपरा कोरोनाच्या प्रादुर्भावाने रद्द करण्यात आली आहे.

सध्या राज्यात कोरोना सारख्या वैश्विक महामारीमुळे संपूर्ण संचारबंदी आणि जमावबंदी आहे त्यामुळे कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला परवानगी नाही. त्यामुळे येथील यात्रा महोत्सव रद्द झाल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे.

ही यात्रा विदर्भातील प्रसिद्ध यात्रा म्हणून ओळखली जाते. पवनूर येथील अरुण लांडे व त्याचे सहकारी एका लाकडी जुला स्वतःला लटकून गावाला प्रदक्षिणा करतात. या यात्रेला पंचक्रोशीतील भाविकांची गदर्री असते. संपूर्ण राज्यावर कोरोनाचे ग्रहण असल्याने शासकीय आदेशानुसार या यात्रेला निर्बंध घालण्यात आले आहे.

हेही वाचा: 'केंद्र सरकारची महाराष्ट्राला सर्वाधिक मदत; राज्य सरकारचे आरोप चुकीचे' : देवेंद्र फडणवीस

आता फक्त विधिवत पूजा करण्यात येणार आहे. भाविकांना मंदिरात गर्दी न करण्याबाबत सूचनाही लावण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. दरवर्षी या रथयात्रेला गावात घरोघरी आप्तेष्ट, नातेवाईक येतात. सासरी गेलेल्या मुली या यात्रेसाठी माहेरी येतात. घरोघरी पानग्याचा स्वयंपाक केला जातो, परंतु यात्रा महोत्सव रद्द झाल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे मंदिर परिसरात गर्दी करू नये व यात्रा महोत्सव रद्द असल्याने भाविकांनी येणे टाळावे, असे आवाहन पवनूर वासींनी केले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ