
नागपूर : लग्नाला विरोध आणि उधारीचे पैसे न दिल्याने जावयाने भरदिवसा रस्त्यावर सासूवर चाकूने वार करीत खून केला. ही थरारक घटना बुधवारी (ता.२३) दुपारी दोन वाजताच्या सुमारास जी. एस. कॉलेजजवळील मुलांच्या वसतिगृहासमोर रस्त्यावर घडली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे.